2 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना BMW ने उडवले, एकाचा मृत्यू

मंुबई : मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आहे. त्यानंतर चालक पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.
मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली.
धडक देऊन हा चालक थांबला नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने तो पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झालं असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.
मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनरजवळ गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते सकाळच्या सुमारास बॅनर लावत होते. यावेळी एक BMW वेगाने आली अन् तिने प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील यांना उडवले. यात प्रीमत थोरात यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसाद पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *