पुणे : भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी केला, असा आरोप करत भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले.

महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप आंदोलक पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे घुले यांनी सांगितले. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला. मात्र  विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *