वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञांची कंत्राटी भरती

मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता आपत्कालीन सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीचा शिरकाव होणार आहे. पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता तज्ज्ञ आठ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे, मात्र ही भरती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची जबाबदारी आता कंत्राटी डॉक्टरांच्या हाती असणार आहे.

भविष्यात काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. नायर, सायर, केईएम, कूपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने धाव घेतात, मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला आहे.

पालिका रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार देत लवकरात लवकर ठणठणीत करून घरी पाठवणे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे कर्तव्य आहे, मात्र पालिका रुग्णालयात आता कंत्राटी पद्धतीचा बोलबाला असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *