भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत

मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते.

माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली.

खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले.

या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *