ठाणे : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), ठाणे द्वारा शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) ४०० ६०३ मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन समारंभ (आभासी पध्दतीने) रविवार, दि. १५ सप्टेंबर २०२४, सकाळी ११.०० वाजता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार अॅड. निरंजन डावखरे, कोपरी-ठाणे नगरसेवक भरत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार भरत चव्हाण यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभणार असून नागरिकांनीही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतिश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुलुंड चे सहसंचालक अनिल गावित, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनिल सदाफुले, औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे (मुलींची) च्या प्राचार्य श्रीमती सरला खोब्रागडे या सर्वांनी केले आहे.
