मुंबई : सिनेअभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी ब्रांदा येथील राहत्या घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ते ६५ वर्षांचे होते. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मंगळवारी ११ सप्टेंबररोजी सकाळी नऊ वाजता सहाव्या मजल्यावरून उडी घेत मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी जेंव्हा आत्महत्या केली, त्यावेळी तिची आईच घरात होती. आत्महत्येच्या काही मिनिटांच्या अगोदरच अनिल अरोरा यांनी मुलगी अमृता अरोरा हिला फोन केला होता, असे सुत्रांनी सांगितले परंतु अद्याप पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मलायका मुंबईबाहेर होती. ती मुंबईत पोहचली असून अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी  मलायकाची घरी भेट घेत सांत्वने केले.

मलायकाचा जन्म ठाण्यात झाला. ती ११ वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती आई जॉयस पॉलीकार्प आणि बहीण अमृता अरोरा याच्यासोबत चेंबूरला राहायला गेली. तिची आई ही मल्याळी ख्रिश्चन आहे, तर तिचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी होते. त्यांनी भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. मलायकाप्रमाणे तिची धाकटी बहीण अमृता अरोरा अभिनेत्री आहे. दोन्ही मुलींचे संगोपन त्यांच्या आईने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *