शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण…
लहानमुलांनी टाहो फोडला तरी बेभानपणे मारहाण सुरु
रायगड : महाराष्ट्रात नेमके चाललेय काय ? भाजपा प्रदेशाध्यक्षांची मुले दारूच्या नशेत कारने गाड्या उडवतात तरी त्यांच्यावर एफआयर नोंदविले जात नाहीत. भाजपा आमदार भर पोलिस चौकीत प्रतिस्पर्ध्यावर सहा गोळ्या झाडतो तरी त्याला अजून पक्षातून निलंबित केले जात नाही आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक भर दिवसा एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटींगच्या स्टाईलने निर्दयीपणए रॉडने जबरा मारहाण करतोय. हा व्हिडीयो आज सोशल मीडियावरून व्हायरल होताच नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तीर काय असा संतप्त सवाल सरकारला विचारला आहे.
या घटनेचा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवेसेनेनेही ट्वीटरवर पोस्ट केलाय. त्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महेंद्र थोरवे आमदार आहेत, त्यांच्या बॉडीगार्डने ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.
नेरळमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. “मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!”, असा आशय लिहित ठाकरे गटाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कारमध्ये एक व्यक्ती बसलाय. त्याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर त्याला मारहाण केल्याचे व्हिडीयोत दिसतेय. ही मारहाणा होत असताना लहान मुले हंबरडा फोडत असल्याचेही दिसून येतेय तरीही हा बॉडीगार्ड बेदम मारहाण करीत असल्याचे दिसून येतेय.
या अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय. शिवा असं महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव आहे, त्याच्याकडून ही मारहाण केली जात असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण झाली आणि ज्याने मारहाण केली ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. आपआपसांत त्यांचे मतभेद झालेत. नेमकं काय झालंय याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो, आता गेल्यानंतर त्याबाबतची माहिती घेईल. आम्हाला सत्तेची मस्ती वगैरे नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. ठाकरे गट त्याच भांडवल करत आहात. संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
हा सत्तेचा माज आणि फक्त माज आहे. त्याशिवाय कोण असं करत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारहोउनही येथे आमदाराला पक्षातून काढले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिलीय.
