तुर्भे : स्वातंत्र्यसेनानी तथा भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशी येथील शिवनेरी नगर सहकारी पतपेढीमध्ये अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी विनोबा भावे यांना अभिवादन केले. विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आहे. विनोबा भावे हे महाराष्ट्रात जन्मलेले असून राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव करावा. तसेच त्यांची भूदान व ग्रामदान चळवळ पुढे अविरत सुरू ठेवण्याची मागणी या वेळी बाळासाहेब शिंदे यांनी केली. या वेळी मनोज देसाई, रोहित खोत, तुषार मराठे, प्रथमेश शिंदे, शिवाजी धनावडे, ऋतिक लाड, सनी शहा, दीपाली कोंढाळकर, दीपा सुखदेव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *