ठाणे : ठाण्यातील सावरकर नगर येथील कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कला क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ध्येयवादी कलाकारांना सदर पुरस्कार नवी मुंबई स्थित कलासाधना सामाजिक संस्थे तर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.यंदाचा कला क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२४ दत्तात्रय चिव्हाणे यांना जाहीर झाला आहे.

ठाणे शहरात अनेक वर्ष  दत्तात्रय महादेव चिव्हाणे कला क्षेत्रात काम करत आहेत.दत्तात्रय  चिव्हाणे यांना लहान पनापासून कलेची आवड आहे . मूर्तिकला, चित्रकला मॉडेल बनविणे आणि इको फ्रेंडली गणपती बनविण्याच्या कार्यशाळा सुध्दा ते घेतात आणि सामाजिक कार्यात सुध्दा ते सहभाग घेतात. चिव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक विद्यार्थी कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले आहे .  यामुळे दत्तात्रय चिव्हाणे यांनी मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *