Photo-8

 

ठाणे :

ठाण्यातील प्रख्यात वास्तू विशारद संजय बोबडे यांच्या निवासस्थानी आयोध्येचे दर्शन घडविणारी पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती साकारली आहे.

हिरानंदानी इस्टेट येथे वास्तव्यास असलेले संजय बोबडे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असतात. त्यांनी यंदा आपल्या घरात शाडूच्या मातीतून फक्त दोनच रंगांचा वापर करून मूर्ती साकारली आहे. तर मूर्तीच्या सभोवती कागदापासून महिरप तयार केली आहे. या महिरपीवर आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीप्रमाणेच आरेखन केले आहे. अतिशय सुंदर आणि सुबक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे परिसरात कौतूक होत आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *