मुंबई : येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंचांचे निवासी प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्रमसाफल्य निवास, खंडाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन २१ सप्टेंबर, दुपारी ३ वाजता होईल. या शिबिरात मीनानाथ धानजी, तांत्रिक समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मालोजी भोसले, तांत्रिक समिती सचिव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन हे मार्गदर्शन करतील. सामन्यांवरील पंचांची कामगिरी, देहबोली – निर्णय क्षमता, पंचांची सेवा ज्येष्ठता, पंचांचा आत्मसन्मान, पंचांची सुरक्षितता या विषयावर देखील शिबिरात चर्चा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी शिबिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या शिबिराच्या प्रवेशाबाबत सचिन नाक्ती, मोबाईल क्रमांक : ७५०६०३५१२८, नरेंद्र लाड, मोबाईल क्रमांक : ९१६७३५३५६५, प्रशांत भगत, मोबाईल क्रमांक : ९७६९८३९३५१ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *