नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही विभागात कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 8 ही विभागात दि.18/09/2024 व दि.19/09/2024 रोजी या दोन दिवसात छोटे बॅनर 1893 व मोठे बॅनर 623 असे एकुण 2516 बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर प्रिंट करुन देणारे एकुण 22 प्रिंटींग करणाऱ्या व्यवसायीकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सुचना देण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापु नये व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात येईल अश्याही सुचना देण्यात आल्या. यापुढे अनधिकृत बॅनर्स/होर्डींग्ज विरुध्द कारवाई तीव्र करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *