मुंबई : शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच धमाका उडवून दिला आहे. सिडकोची बंपर लॉटरी दसऱ्याच्या मुहुर्तावर निघणार आहे. या लॉटरीअंतर्गत तब्बल ४० हजार घरे विकली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. येत्या दसऱ्याला सिडको ही लॉटरी घेऊन येणार आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई उपनगरांत राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. सिडकोने आतापर्यंत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी कधीच काढलेली नाही.

मात्र या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल ४० हजार घरांची लॅाटरी निघणार आहे. सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत. सिडकोकडून सध्या ६७ हाजार घरांचे काम सुरू आहे. यातील साधारण ४० हाजार घरे बाधून पूर्ण झाली आहेत.

घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *