भाईंदर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे तसेच यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही अभियान राबविण्यात येणार आहे
या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा अन्तर्गत इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिवस निमित्ताने दिनांक 21सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता उत्तन बीच आणि वेलकंनी बीच येथे मेगा बीच क्लीन ड्राईव्ह हा उपक्रम राबविणे बाबत मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी निर्देश दिले आहेत.सदर मनपा कर्मचारी, NGO व शहरातील नागरिकांनी मिळून स्वच्छता ही सेवा यासाठी श्रमदान करावे.तसेच सदर स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. प्रभाग अधिकारी यांनी नियत्रंण अधिकारी यांच्या अधिनिस्त कर्मचारी यांची बैठक बोलावून आपली नेमणूक करण्यात आलेल्या ठिकाणी सदर मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मिरा भाईंदर शहरातील विद्यार्थी, सामाजिक संस्था, बचत गट, राजकीय नेते,स्थानिक NGO आणि समस्त नागरिक यांनी उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत या उपक्रमाची शोभा वाढवावी यासाठी मिरा भाईंदर महानगर पालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.
