बारामती : केंद्र सरकारच्या खेलो इंडिया वुमन्स लीग योजने अंतर्गत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, एन्व्हार्यरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि क्रीडा जागृती यांच्या सौजन्याने बारामती येथे आयोजित रोड सायकल स्पर्धेत आज पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी स्पर्धेवर वर्चस्व राखले. मुलींच्या ज्युनिअर वयोगटात … किमी अंतराच्या टाईम ट्रायल प्रकारात जुई नारकर (22.43.47) , आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू सिद्धी शिर्के (22.51.53) आणि राष्ट्रीय सायकलपटू आकांक्षा म्हेत्रे (23.27.20) या महाराष्ट्राच्या मुलींनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जयदादा पवार यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, प्रविण पाटील, साईचे ॲडेंट ॲडींटीफिकेशन समितीच् सदस्य मनिष सहानी, सार्थक गंगावणे, मुख्य पंच धरमेंदर लांबा, आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे, दिपाली पाटील, मिनाक्षी शिंदे, मिलींद झोडगे आदी मान्यवर हजर होते.
आज सकाळी झालेल्या मुलींच्या सब ज्युनिअर वयोगटात १० किमी टाईम ट्रायल प्रकारात गोव्याच्या एन्जे माशा फर्नाडीस हिने महाराष्ट्राच्या मुलींना शह देताना सुवर्णपदक पटकावले. तिने १६.१९.८१४ वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या मानसी महाजन हिने १६ मि. ३२.१३५ से. वेळ नोंदवत रौप्य पदक आणि प्राजक्ता सुर्यवंशी हिने १६.४०.८७९ वेळ नोंदवत तिसरी तर श्रावणी परीट १६.४६.९१२ वेळ नोंदवत चौथ क्रमांक मिळवला.
आज झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जयदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीयाचे पदाधिकारी, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, प्रविण पाटील आदी मान्यवर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *