दिवा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा चांगला प्रतिसाद आता विरोधी पक्षांतील बऱ्याच नेत्यांना पोटदुखी होताना दिसत आहे. तर मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना काँग्रेस नेते सुनील केदारे यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यावर बंद करु असे विधान केलेले आहे.
या विधानाचा शिवसेनेकडून राज्यभर निषेध होत आहे. गुरुवार 19 तारखेला डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने काँग्रेसचे सुनील केदारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.
शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व जिल्हा संघटक लता पाटील यांच्या आदेशानुसार उपजिल्हा संघटक इंदिरा भोईर, जिल्हा संघटक शितल लोके, कविता गावंड, केतकी पोवार, स्वाती हिरवे, रोशना पाटील, उज्वला भोसले, लक्ष्मी पवार, अस्मिता खानविलकर, अवनी शर्मा यासह इतर महिला आघाडीने आंदोलन केले.
आंदोलनात महिलांनी आक्रोश व्यक्त करत केदारे यांना ‘सावत्र भावाची’ उपमा दिली. ‘साडी चोळी बांगड्या सुनील केदारेच्या तोडू तंगड्या’, ‘मिळून साऱ्या बहिणी काँग्रेसला पाजू पाणी’, “सुनिल केदारेचे करायचे काय, खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत शिवसैनिक महिलांनी केदारे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला.
माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सुनील केदारे यांच्या लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या विधानावर शिंदे गटाच्या उपसंघटक कविता गावंड यांनी जोरदार हल्ला चढवत डोंबिवलीतील इंदिरा चौकात घोषणा दिल्या. त्या म्हणाल्या, आता पर्यंत जेव्हढे सरकार आली त्यांनी फक्त योजना आणल्या होत्या पण त्या लागू केल्या नाहीत.
त्या विविध योजना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी राबवण्याचे काम केलेले आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे. ग्रामीण महिलेला हे मिळणारे महिन्याचे पंधाराशे रुपये हे मानधन आहे. तसेच ही योजना बंद करण्याचा सुनिल केदारे हा जो वळवळणारा किडा आहे. त्याच्या ह्या विधानाचा आम्ही सर्व जाहिर निषेध करतो आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *