राष्ट्रीय हिंदी दिवस ठाण्यात संपन्न

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ठाणे लेक सिटीच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदी दिवस काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. कालिदास लिखीत शाकुंतलम नाटकातील एका अंकाचे प्रख्यात लेखक पद्ममश्री शरद जोशी यांनी  लिहीलेल्या विनोदी नाट्य अंकाचे यावेळी वाचन करण्यात आले.

शरद जोशी यांची कन्या रिचा यांचा यावेळी रोटरीच्या वतीने गर्व्हनर दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमीयमच्या अध्यक्षा डॉ. सोनल बांगडे, रोटरी क्लब ऑफ लेकसिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही रोटरी क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिकानी भरभरून प्रतिसाद दिला.

लेखिका दिग्दर्शक प्रीता माथुर ठाकुर, अतुल माथुर, रमेश कुमार, अमन गुप्ता, दुर्गेश बक्शी, लता संजय यांनी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले.

रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो, त्याचाच भाग म्हणून या नाट्य अंकाचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी करण्यात आले. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तिचा सन्मान आपण राखला पाहिजे, जेव्हा भाषेचा वापर दैनंदिन जीवनातून कमी व्हायला लागतो त्यावेळी आपण आपली संस्कृती, इतिहास विसरू लागतो, तेव्हा आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला हवा असे मत रोटरीचे गर्व्हनर दिनेश मेहता यांनी व्यक्त केले. सुरूवातीला प्रास्ताविक डॉ. सोनल बांगडे यांनी केले तर, आभार जगदीश चेलारामानी यांनी मानले. रोटरीच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या  सहकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *