ठाणे महानरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व *माझी वसुंधरा स्पर्धा’ राबविण्यात आली होती या स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळाच्या बा.ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महावद्यालयाला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहे, ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका (TMC)* द्वारे आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाविद्यालये, उद्योग आणि एनजीओकडून पर्यावरणीय शाश्वत प्रयत्ना साठी केलेल्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतली जाते. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला या उल्लेखनीय कामगिरीसाठी *₹१,०२,००० चे रोख बक्षीस देण्यात आले आहे.
‘माझी वसुंधरा स्पर्धा’ ही संस्थांना पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास,आणि हवामान बदलाच्या उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केली जाते. या पुरस्कारामुळे विविध *पर्यावरणपूरक उपक्रम,विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आमच्या प्रयत्नांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे महाविद्यालयाच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन होते
हे यश गाठण्यासाठी *विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, समिती समन्वयकांचे आणि कार्यालयीन व प्रयोगशाळेतील सहायक कर्मचारी वर्गाचे एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे. क्रियाकलापांचे अहवाल, उपस्थिती, अभिप्राय आणि भू-संकेतित छायाचित्रांचे दस्तऐवजीकरण यामुळे हा सन्मान मिळवणे शक्य झाले*असे मत यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर यांनी व्यक्त केले. तसेच
पर्यावरणशास्त्र विभाग (EVS), BWCM, NSS, NCC आणि ग्रीन क्लब* यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी कौतुक केले .
पर्यावरण प्रकल्पांच्या दिशेने त्यांचे अविरत प्रयत्न आणि समर्पण या यशात मोलाचे ठरले आहे असेही त्या म्हणाल्या.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर यांचे व संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ अधिकारी सन्माननीय डॉ.विजय बेडेकर, डॉ.महेश बेडेकर, श्री.अभय मराठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शाश्वत भविष्यासाठी या प्रयत्नांना सतत पुढे नेण्याच्या महत्त्वावर भर दिला.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत व काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
