ठाण्याच्या शौर्या अंबुरेची विशेष कामगिरी
पुणे- महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा यावर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या . या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने क्रीडाप्रेमींचं विशेष लक्ष वेधून घेतलं . शौर्या हिने १६ वर्षाखालील मुलींच्या ६० मी धावणे या शर्यतीमध्ये ७.५८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले . यापूर्वीचा राज्य विक्रम ७.९५ सेकंद असून राष्ट्रीय विक्रम ७.७७ सेकंद इतका आहे. तसेच ८०मी अडथळा शर्यतीत सुद्धा शौर्या हिने ११.४७ सेकंदाचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वीचा राज्य विक्रम ११.७६ सेकंद आहे व राष्ट्रीय विक्रम ११.५ सेकंद इतका आहे . ठाण्याच्या शौर्याने एकापाठोपाठ एक असे दोन विक्रम नोंदवल्याने सर्व क्रीडाजगतामध्ये तिचे कौतुक होत आहे . शौर्या ही ठाण्याच्या universal high शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांकडून त्यांच्या Aim Sports and Fitness अकॅडमी मध्ये गेली ८ वर्ष प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत व त्यांच्या Aim Sports foundation च्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबवत असतात.
