मुंबई : डाॅ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
डाॅ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला. यावेळी पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १५०० हुन अधिक विद्यार्थ्यांना पदवी तर ११ स्नातकांना विद्या वाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात गुणवत्ताप्राप्त स्नातकांना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. दीक्षांत समारंभाला राज्याचे नागपूर येथील आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, कुलगुरु डॉ. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, जनरल कौन्सिल, विद्वाना परिषद, व्यवस्थापन परिषद, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.
000
