म्युझिकल फाउंटनच्या ‘वॉटर स्क्रीन’वर दिसणार
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण, १६ कोटींच्या खर्चातून पूर्ण झाले तलाव सुशोभीकरण -प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील २ तलावांचे सुशोभीकरण करून त्यात ‘म्युझिकल फाउंटन’ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी या म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण होणार आहे. मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात हे संगीत कारंजे बसवले गेले असून यामुळे तलावासोबतच परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवघर येथील तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलाव या तलावात म्युझिकल फाउंटन ३० तारखेपासून सुरु होणार असून दररोज रात्री म्युझिकल फाउंटनचे येथे शो येथे होतील , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दोन्ही तलावातील या कामांवर सुमारे १६ कोटी खर्च करून हे भव्य – दिव्य आकर्षक काम पूर्ण केले गेले असून मीरा भाईंदर शहर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामात मोठी भर पडली आहे.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर , गोडदेव , काशिमीरा तलाव हे जुने तलाव असून येथे परिसरातील नागरिक फिरण्यासाठी , निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ – संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून याकामासाठी १०० टक्के निधी राज्य सरकार कडून आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला होता. हा निधी राज्य सरकारने मीरा भाईंदर महापालिकेला दिला होता. त्यातून तिन्ही तलावात सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यातील दोन तलावातील कामे पूर्ण झाली आहेत. आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी सुशोभीकरणाच्या कामाच्या साईटवर जाऊन आढावा घेतला, कामाला गती दिली. गेल्या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की , नवघर येथील तलावाचे सुभोभिकारण करण्यात आले आहे आणि तलावात म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. नवघर तलावाच्या आत असलेल्या म्युझिकल फाउंटन म्हणजेच संगीत कारंजे उडतील त्यावर ‘वॉटर स्क्रीन’ बनेल. त्यावर ऑडिओ व्हिडीओ कन्टेन्ट म्हणजेच पाच – पाच मिनिटांचे शो दाखवले जातील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज , अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे मंदिर , मीरा भाईंदरचा इतिहास यावर हे म्युझिकल फाउंटन शो होणार आहेत व त्याची स्क्रिप्ट बनवली जात आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाउंटन सोबत ‘फायर नोझल’ लावला गेला आहे. फायर नोझल म्हणजे म्युझिकल फाउंटन सुरु असताना काही नोझल मधून फायर निघते …वॉटर आणि फायरचा संगम येथे पाहायला मिळेल. शिवाय नवघर तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाच्या परिसरात अम्पी थियेटर बनवले असून तेथे ५०० लोक बसून हा म्युझिकल फाउंटन शो बघू शकतील. लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे , तलावाला ग्रील लावले आहेत व लॅन्ड स्केपिंग गार्डन केले गेले आहे. नवीन कुंपण भिंत, नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे , बसायला वेगवेगळे कट्टे बनवले आहेत. नवघरच्या तलावात होणारा म्युझिकल फाउंटनचा शो हा लक्षवेधी , नयनरम्य आणि पाहण्यासारखा असेल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज रात्री ७ , ८ व ९ वाजता म्युझिकल फाउंटनचे शो होतील व संपूर्ण मीरा भाईंदर मधून लोक ते बघण्यासाठी येतील असेही ते म्हणाले. आकर्षक लाईट इफेक्ट्स विद्युत रोषणाई या म्युझिकल फाउंटच्या वेळी पाहायला मिळेल आणि लोक हे पाहताना आनंद व्यक्त करतील. काशिमीरा येथील जरीमरी तलाव येथेही म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. संगीतावर नाचणारे कारंजे येथे दिसतील. विशेष म्हणजे या संगीत कारंज्याची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषांप्रमाणे बदलू शकणार आहे अशी त्यात व्यवस्था केली गेली आहे. स्वातंत्र्य दिन , दिवाळी , श्री गणेशोत्सव असे जे जे महत्वाचे दिवस असतील त्या दिवशी त्या म्युझिकल फाउंटनचे रंग बदलतील आणि त्या रंगातील व त्या म्युझिकवर म्युझिकल फाउंटन बघायला मिळतील. देशभक्ती , भक्ती संगीत किंवा प्रत्येक दिवसाप्रमाणे म्युझिकल फाउंटन सुरु राहणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मीरा भाईंदरच्या दोन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे या कामामुळे पालटले गेले असून परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे तलाव सुशोभीकरण करीत असताना तलावाचे पाणी कायम शुद्ध राहील याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरला भरभरून विकास निधी दिल्याने ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर शहर खूप विकसित आणि सुशोभित होत आहे. ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदरही सुशोभीकरणात पुढे चालले आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. ठाण्याच्या उपवन तलावात म्युझिकल फाउंटन लावला गेला आहे. त्याचप्रमाणे आता मीरा भाईंदरच्या दोन तलावात हे म्युझिक फाउंटन लावले गेले आहेत. नवघर तलावात तर म्युझिकल फाउंटनचे काम करताना फायर नोझल पहिल्यांदा लावला गेला आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडून निधी आणला. त्यांच्या संकल्पनेतून तलाव सुशोभीकरणासोबतच म्युझिकल फाउंटन लावले गेले. शिवाय आमदार सरनाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , जागेवर येऊन वेळोवेळी घेतलेला कामाचा आढावा व दिलेल्या सूचना यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले आणि संपूर्ण मीरा भाईंदरकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल , असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
