नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा 10 तास बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गुरुवार संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील नागरीकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
