मुंबई:- शिवनेरी सेवा मंडळाच्या विद्यमाने, मुंबई शहर कबड्डी  असोसिएशनच्या मान्यतेने ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष व्यावसायिक, व्यावसायिक “अ”, महिला तसेच कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेने मुंबईत कबड्डीच्या मोसमाची सुरुवात होते. दादर(पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेकरीता दोन क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहेत. माजी नगरसेवक स्व. मोहन राजाराम नाईक चषकाकरीता खेळविण्यात येणारी ही स्पर्धा सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येते. ज्या संघाना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज पूर्ण भरून प्रवेश शुल्कासह १ ऑक्टोबरपर्यंत मंडळाच्या कार्यालयात जमा करावे. अधिक माहितीकरिता गुरू मोरजकर (9892973750), राघव परब(9967372628) यांच्याशी संपर्क साधावा. अशी माहिती एका परिपत्रका द्वारे स्पर्धा प्रमुख प्रकाश भोसले यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली आहे.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *