मुंबई:- मुंबई शहर कबड्डी असो.ची २०२३-२४ची “५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा” शनिवार,२८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे मुंबई शहर संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची सूचना व वार्षिक अहवाल सर्व संलग्न संस्थांना हस्ते पर हस्ते पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
ज्या संस्थांना अहवाल मिळाला नसेल त्यांना तो (www.mumbaishaharkabaddi.com.) या संघटनेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे किंवा ते कार्यालयीन वेळेत संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधून घेऊन जाऊ शकतात. तरी या सभेस वेळेत उपस्थित राहून ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे.
