उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली आहे.
या शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशनकडून पुढाकार घेण्यात आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत. या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च 3 लक्ष ते 5 लक्ष रूपये ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *