थोर समाजसुधारक व विचारवंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, विलास मलुष्टे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.समाजातील अंतिम व्यक्तीच्या विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची प्रेरणा पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या चरित्रापासून मिळते त्यामुळे त्यांचा जयंती दिन अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
