रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात
माथेरान : ई रिक्षामुळे माथेरान मध्ये पर्यटन क्रांती घडत आहे. परंतु या रिक्षाच्या मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास करताना रिक्षाला खर्चिक बाब होत आहे तर काही भागात खाचखळग्यातून जाताना त्रासदायक बनत होते. येथील वखारी नाक्यापासून ते पांडे रोडच्या पुढील भागापर्यंत पावसाळी पाण्याच्या प्रचंड ओघाने खूपच रस्ता खराब झाला होता. याकामी अनेकदा लोकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.याकामी कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले त्यानुसार या रस्त्याची कामे सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहेत यामुळे पायी चालत जाणाऱ्या त्याचप्रमाणे ई रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे ते रस्ते सुध्दा जलदगतीने दुरुस्त करावेत अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
0000
