मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून १०० मीटर वाहून गेली. अग्निशमन दलानं एक ते दीड तास सर्च ऑपरेशन राबवून महिलेला नाल्यातून बाहेर काढलं. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.

विमला अनिल गायकवाड वय 45 वर्ष असं मृत महिलेचा नाव आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चूक नेमकी कोणाची आहे. कोणाच्या चुकीमुळे या महिलाचा बळी गेला आहे, या संदर्भात अधिक तपास करत आहेत. मेट्रो तीन लाईनचं 5 ऑक्टोबरला उद्घाटन आहे.मात्र या उद्घाटना आधी एमएमआरडीएच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात सिप्झ  कंपनीच्या समोर ही महिला काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना मेट्रोच्या कामासाठी खड्डा काढण्यात आला होता, त्या खड्ड्यावर झाकण टाकलं गेलं नव्हतं. त्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला.

सिप्झ कंपनी समोर रस्त्यावर मेट्रो तीन लाईन साठी काम करण्यात आलं होता. काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हॅन्ड ओव्हर करायचं होता. मात्र, मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभागाने मेट्रो तीन लाईनला पत्र लिहून संपूर्ण रस्त्याचा पहिल्या सारखं काम करून मग हँड ओव्हर करा, असा पत्र दिले होते.

सध्या ड्रेनेज लाईन वर मुंबई पोलिसांनी ढाकणं मागून मध्यरात्री ओपन ड्रेनेज झाकण लावून बंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *