जालना : यावर्षीपासून नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून निवडणूकीचे रणशिंग फुंकतील. नारायण गडावर झालेल्या बैठकीत जरांगेंनी तशी घोषणा केली.
या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.
राज्यात दसरा मेळाव्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. मुंबईत शिवतिर्थावर ठाकरेंच्या सनेचा तर बीडच्या सावरगाव घाट मध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे.
