मुंबई : नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय देईल. आमचे सरकार आल्यास तुमच्या मागण्या पुर्ण करु असा विश्वास काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत सकल नाभिक समाजाच्या महाआंदोलनास भेट देऊन दिला.
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असून समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नाभिक समाजाला न्याय देणाऱ्या योजना सरकार राबवेल अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी आणि मोठया संख्येने राज्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.