सोयगाव : पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर चक्क बिबट्या आडवा होऊन या बिबट्याने चक्क पंधरा मिनिटे पालकमंत्र्यांच्या ताफा अडवून ठेवल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हळदा घाटातील वेताळवाडी किल्ल्या जवळ घडली दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे पालकमंत्री यांचे वाहन बिबट्या जवळच उभे राहिल्या वर तातडीने गाडीच्या काचा लावण्यात आलयामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क गाडीतून जवळून बिबट्या पहिला यामुळे हळदा घाटात चक्क पंधरा मिनिटंपेक्षा अधिक काळ वाहनांचा ताफा बिबट्याने अडवून धरला होता
सिल्लोड वरून सोयगावला मुक्कामी येतांना पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उंडनगाव येथील कार्यक्रम आटोपून सोयगाव कडे जात असताना हळदा घाटात रस्त्यावर वेताळवाडी जवळ बिबट्या वाघाने चक्क पालकमंत्री सत्तार यांच्या वाहनाला आडवा झाला दरम्यान सत्तार यांच्या वाहनाला ब्रेक करताच त्यांच्या पाठीमागील ताफा ठप्प झाला होता बिबट्या मात्र डरकाळ्या काढत पालकमंत्री सत्तार यांच्या वाहन जवळ उभाच होता तातडीने ताफ्यातील मागील वाहनांच्या लाईटच्या फोकस बिबट्या वर मारून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तब्बल पंधरा मिनिटे पेक्षा अधिक वेळ बिबट्या रस्त्यावर आडवा होता त्यामुळे सर्वांची घबराट उडाली होती..अखेर बिबट्याने घाटातील जंगलात धूम ठोकल्या वर पालकमंत्री सत्तार यांनी सुटकेचा श्वास सोडून सोयगाव कडे प्रस्थान केले
—–दरम्यान मंगळवारी रात्री पालकमंत्री यांच्या प्रोटोकॉल च्या ताफ्याला बिबट्या आडवा झाल्या ची घटना उघडकीस आल्या मुळे बुधवरी सोयगाव वनविभागाने बिबट्या ची शोध मोहीम हाती घेतली होती मात्र बुधवरी चार वाजेपर्यंत बिबट्या वनविभागाला हाती लागला नव्हता त्यामुळे या घाटातून रस्त्यावर जातांना वाहनधारकांना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे….
चौकट—
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव सह वेताळवाडी, गलवाडा आदी भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *