खट्टी मीठीचा अभिनव प्रयोग

मुंबई : अमेरिका खट्टी मीठी या ग्रंथाली प्रकाशित पुस्तकावर आधारीत दृकश्राव्य असा अभिनव प्रयोग नुकताच नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स-नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता. लेखिका डॉ. मृण्मयी भजक यांनी आपल्या सादरीकरणाच्या कौशल्याने उपस्थितांची दाद मिळवली. अमेरिकेतील गमती, माणसांचे किस्से आणि संस्कृतींची ओळख, हसत खेळत, वेगवेगळ्या कथानकांतून करून देणाऱ्या या मनोरंजक कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती लाभली.

ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर , आय ए एएस अधिकारी दिलीप शिंदे यांच्यासह अनेक  मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली.

एन सी पी ए संदर्भ ग्रंथालय व प्रलेखन केंद्राच्या प्रमुख डॉ. सुजाता जाधव यांनी स्वगतपर प्रास्ताविक केले.

हावरे लीगसी प्रायोजित,ऑगस्ट मीडियाच्या साहाय्याने, एनसीपीए  लायब्ररी अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवीन पिढीसह सर्व वयोगटातील मराठी प्रेक्षकांना रंगभूमीकडे आकर्षित करणे आणि त्यांना व्यापक शुद्ध, कौटुंबिक मनोरंजन प्रदान करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. मृण्मयी भजक म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *