Vinayak Bhoir 1

– कांगा लीग क्रिकेट स्पर्धा

 

मुंबई : विनायक भोईरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इस्लाम जिमखान्याने एमसीए डॉ. एच.डी. कांगा क्रिकेट लीगच्या ब डिव्हिजनमध्ये खार जिमखान्यावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.

इस्लाम जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात बुधवारी प्रथम फलंदाजी करताना इस्लाम जिमखाना संघाने 34.3 षटकांत 9 बाद 192 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज भोईरने 59 चेंडूंत 4 चौकार आणि सहा षटकारांसह 73 धावा तडकावताना सर्वाधिक योगदान दिले. खार जिमखान्याचा मध्यमगती गोलंदाज अब्दुल खानने 45 धावांत 6 विकेट घेतल्या.

त्यानंतर इस्लाम जिमखान्याचा मध्यमगती गोलंदाज जावेद खान (30 धावांत 4 विकेट) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विनायक भोईरने (35 धावांत 3 विकेट) अचूक आणि प्रभावी गोलंदाजी करताना खार जिमखाना संघाचा डाव 39.5 षटकांत 127 धावांत गुंडाळून संघाला पहिल्या डावात निर्णायक आघाडी मिळवून दिली. इस्लाम जिमखान्याने दुसऱ्या डावात 4.4 षटकात 2 बाद 25 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक – ब डिव्हिजन: यंग कॉम्रेड सीसी – 31.2 षटकांत सर्वबाद 98(शमीत शेट्टी 28; सचिन गुप्ता 3/20) आणि 22.5 षटकांत 5 बाद 65(मयुरेश तांडेल 37) वि. सिंध एससी – 30.2 षटकांत 4 बाद 128(साई चव्हाण 45, सुजय ठक्कर 28, शमीत शेट्टी 3/45). निकाल: सिंध एससी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

न्यू हिंदू सीसी – ५३.५ षटकांत सर्वबाद 172 (विनय कुंवर ३६, रोहित शुक्ला २८; सचिन सोळंकी ४/४४, वेदांत गुरव ३/२७) वि. साईनाथ एससी – २४.२ षटकांत सर्वबाद ९७(जिगर राणा ३६; राजेश सरदार ५/२७, जुगराज मेहता 4/22). निकाल: न्यू हिंद पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

इस्लाम जिमखाना – 34.3 षटकांत 9 बाद 192(विनायक भोईर 73, सुफियान शेख 28, शाश्वत पाठक 25; अब्दुल खान 6/45) आणि 4.4 षटकांत 2 बाद 25 वि. खार जिमखाना – 39.5 षटकांत सर्वबाद 127( स्वयम वाघमारे 142, जावेद खान 4/30, विनायक भोईर 3/35, हितेश कदम 3/52). निकाल – इस्लाम जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब – 39.4 षटकांत सर्वबाद 116(रोहन भोसले 43; कुणाल थोरात 7/20) आणि बिनबाद 20 वि. शिवाजी पार्क यंगस्टर्स एससी -29 षटकांत 6 बाद 120 (शुभम शिंदे 50). निकाल – शिवाजी पार्क यंगस्टर्सने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *