सोयगाव : तालुक्यातील फळबाग व गायगोठा बांधकामाची रक्कम अजूनही जमा झाली नसल्याने सोयगाव शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून हैराण झाले आहेत.
फळबाग लागवड, जनावरांचा गोठा बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी रोजगार हमी योजना विभागात येऊन विचारणा करीत आहेत.जरंडी, बनोटी, गोंदेगाव,सावळदबारा,या परिसरातील आदींसह अनेक गावांत रोजगार हमी योजनांतर्गत अनेक गावात रोजगार हमी ची कामे झाली आहे फळबाग लागवडीसाठी सात लाख पर्यंत अनुदान तीन वर्षांत दिले जाते. विहीर व गाय गोठा योजनेसाठी दोन लाख व चार लाख असे अनुदान दिले जाते दरम्यान गाय गोठा व विहिरी मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी जवळून पैसा खर्च करून कामे केली. मात्र, अजूनही पैसे कुशल कामाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यावर जमा झालेली नाही एकीकडे शेतकऱ्यांना झालेल्या कामांची देयके जमा झाली नसून दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेने नवीन कामांची मंजुरी व देयके खात्यात वर्ग करण्यासाठी पोर्टल बंद केले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी कामांची दिलेले बिले संबंधित रोजगार हमी विभागातील कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन केले नसल्याने शेतकऱ्यांना कुशल बिले मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहे या योजनेतील काही शेतकऱ्यांनी व्याजाने रक्कम काढून गाय गोठा विहीर व फळबाग लागवड आदी कामे केली आहे
चौकट;-शेतकऱ्यांचा सामूहिक आंदोलनाचा इशारा
योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कुशल कामाचे रक्कम जमा झाले नाही. या भागाचे रोजगार हमी योजनाचे दोन्हीही अभियंता सचिन चव्हाण व राहुल राठोड हे पंधरा दिवसांपासून कार्यालयात फिरकले नाहीत. शेतकऱ्यांची कामे होऊन ही या अभियंत्यांनी अद्यापही कामांची मोजमाप पुस्तिका तयार केली नाही अनुदानाची रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
