राजेंद्र साळसकर

मुंबई : शिवाजी नगर गोवंडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या विरोधात ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश राजाराम गुंडेट्टी व श्रीहरी महेश गुंडेट्टी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या,  ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आपला तेजोमय आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू विद्यालयात काही समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी  केला आहे.

या कथित समाजकंटकांनी भायखळा येथील रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले.त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली.निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले.त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले.

याबाबत आम्ही शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही.अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *