मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणारी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ६० मुलींमध्ये चुरशीचे सामने होतील. परिणामी ९ ऑक्टोबरपासून परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये चँम्पियन कॅरम सेटवर शालेय व ज्युनियर कॉलेज सबज्युनियर मुलींचा दर्जेदार खेळ प्रेक्षकांना पाहण्यास मिळेल. पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक-मेडल व ‘स्ट्रायकर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विजेतेपदाच्या दावेदारीसाठी रुईया कॉलेजची सिमरन शिंदे, पोद्दार कॉलेजची रुची माचीवले, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे, निधी सप्रे, स्वरा कदम व सेजल जाधव, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीची देविका जोशी व निधी सावंत, ठाकूर रामनारायण स्कूल दहीसरची तिरुमला काठूरोजीगिरी, सेस मायकल हायस्कूल-कुर्लाची उझमा मलिक, कुमुद विद्यामंदिर-गोवंडीची सोनाली कांबळे, एसआयए कॉलेज-डोंबिवलीची तन्वी परब आदी सब ज्युनियर कॅरमपटू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत खेळणार आहेत. श्रावणी राजगुरू विरुद्ध नावशीन शाह यामधील उद्घाटनीय लढत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी सौ. एस.एल. चव्हाण व प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *