पुण्याच्या दर्शन पुजारी व पूर्वा बर्वेला एकेरीत विजेतेपद
मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनरायझर्स नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरीत अनुक्रमे दर्शन पुजारी आणि पूर्वा बर्वेने विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए) आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगरच्या (बीएएमयू) मान्यतेने गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत शनिवारी दर्शन पुजारीने ऋषभ देशपांडेवर चुरशीच्या लढतीत 21-19, 21-19 असा विजय मिळवला.
महिला एकेरीत पूर्वाने वर्चस्व राखले तरी आर्या कोरगावकरने तिला 17-21, 21-7, 21-11 असे झुंजवले. पहिला गेम गमावल्यानंतर दडपण न घेताना पूर्वाने खेळात आमुलाग्र बदल करताना पुढील दोन्ही गेम जिंकत जेतेपदावर नाव कोरले.
निकाल (पुरुष एकेरी अंतिम फेरी): दर्शन पुजारी विजयी वि. ऋषभ देशपांडे 21-19, 21-19.
उपांत्य फेरी: ऋषभ देशपांडे विजयी वि. 1-वरूण कपूर 21-12, 6-21, 23-21; दर्शन पुजारी विजयी वि. आदित्य त्रिपाठी 21-15, 21-11.
महिला एकेरी अंतिम फेरी: पूर्वा बर्वे विजयी वि. आर्या कोरगावकर 17-21, 21-7, 21-11.
उपांत्य फेरी: पूर्वा बर्वे विजयी वि. 1-साद धर्माधिकारी 21-14, 21-6; आर्या कोरगावकर विजयी वि. सिया सिंग 21-16, 21-14.
