अव्वल मानांकित राजपालला पराभवाचा धक्का
मुंबई, 6 ऑक्टोबर: जिद्दीने आणि निर्धाराने खेळताना वरिंदर सिंगने अव्वल मानांकित संजय राजपालवर 11-7, 5-11, 11-8,12-10 असा शानदार विजय नोंदवत स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या मुंबई मास्टर्स स्क्वॉश स्पर्धेत पुरुष खुला 50 गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत जेतेपदाच्या लढतीत, वरिंदरसमोर संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) नीरज माखिजाचे आव्हान आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत त्याने दलीप त्रिपाठीचा 11-6, 7-11, 11-9, 11-6 असा पराभव केला.
पुरुष खुला 40 गटाची अंतिम फेरी दोन टॉप सीडेड खेळाडूंमध्ये रंगेल. उपांत्य फेरीत अव्वल मानांकित पॉल इपेने आदित्य महेश्वरीला 11-8, 11-2, 11-6 असे सरळ गेममध्ये हरवले.
दुसऱ्या मानांकित संजय पवारने संयुक्त रित्या 3-4 मानांकित अभिषेक लक्ष्मीनारायणचे आव्हान 11-8, 6-11, 11-8, 11-6 असे परतवून लावत उपांत्य फेरीत धडक मारली.
निकाल (सर्व उपांत्य फेरी) – पुरुष खुला 40:1-पॉल इपे विजयी वि. आदित्य महेश्वरी 11-8, 11-2 11-6;
2-संजय पवार विजयी वि. 3-4-अभिषेक लक्ष्मीनारायण 11-8, 6-11, 11-8, 11-6.
पुरुष खुला 45: प्रवीण मूर्ती विजयी वि. शैलेंद्र प्रताप सिंग 11-7, 7-11, 11-7, 11-6;
3-4-बेंजामिन नेदारापल्ली पुढे चाल वि. कुंचेरिया मरट्टुकलम.
पुरुष खुला 50: वरिंदर सिंग विजयी वि. 1-संजय राजपाल 11-7, 5-11, 11-8, 12-10;
नीरज माखिजा (यूएई) विजयी वि. दलीप त्रिपाठी 11-6, 7-11, 11-9, 11-6.
प्रो-कोच: 1-अतुल कुमार यादव विजयी वि. 3-4-सूरज भट्ट 9-11, 11-3, 13-11, 11-4;
3-4-अखिलेश कुमार वि. राजा यादव 11-6, 7-11, 11-6, 11-9.
