भिवंडी : शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील सर्व हिंदूबहुल भागात दुर्गामातेच्या भव्य मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तेथे मोठ्या संख्येने महिला गरबा खेळत दुर्गामाता व अंबेमातेसाठी गाणी गात देवीची सेवा करण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून न्यू कणेरी येथील ओम जय बाबा मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ शेलार,  उत्तर भारतीय मित्र मंडळ घुंगटनगर, अशोकनगर, गोकुळनगर, ब्राह्मण आळी, आदर्शउद्यान, अजंठा कंपाउंड, गायत्रीनगर, पद्मानगर, वऱ्हाळादेवी मंदिर, कामतघर, भाग्य नगर, ताडाळी, ओसवाल वाडी, नवी वस्ती, अंजूरफाटा, भंडारी कंपाउंड आदी भागात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. तर, फेणागाव कामतघर येथील जय माँ सिंहवाहिनी मित्र मंडळ अनेक वर्षांपासून दुर्गामातेच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहे. कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुमित पाटील यांच्या हस्ते मानसरोवरातील भव्य मंडपात दुर्गामातेची मूर्ती बसवण्यात आली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेतेदेखील दुर्गामातेच्या दरबारात हजेरी लावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *