श्री मावळी मंडळ यांस तिहेरी मुकुट

 

ठाणे  : दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित  शतक वर्ष निमित्त जिल्हास्तरीय आंतर शालेय स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूल च्या खो खो संघाने तिहेरी मुकुट संपादन केले आहे. शतक वर्षामध्ये संघाने घवघवीत यश मिळवले म्हणजे त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच.
१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर कळवा विरुद्ध हा सामना १ डाव ३ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये कु आयुष सोनवणे ह्याने 3 मिनिटे संरक्षण केले.  स्वरां जाधव ह्याने १ मिनिटे संरक्षण केले, सोहम ठाकूर ह्याने नाबाद 1 मिनिटे संरक्षण कारून संघास विजयी करण्यात योगदान दिले.
तसेच १७ वर्षाखालील मुलिंच्या संघाने अंतिम समन्यामध्ये न्यु कळवा  हायस्कुल विरुद्ध हा सामना १ डाव २ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदम ह्यांनी अष्टपैलू खेळी करून संघास विजयी केले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर विरुद्ध हा सामना १ डाव ५ गुण राखून एकतर्फी विजेतेपद मिळवले. स्पर्धे मध्ये ह्या संघाने सर्व सामने एकतर्फी विजयी होऊन स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. अंतिम समन्यामध्ये  अभिराज वाळंज ह्याने नाबाद 2 मिनिटे संरक्षण करून समन्यामध्ये 3 गडी  बाद करून अष्टपैलू खेळी केली, पार्थ मायनांक ह्याने 2 मिनिटे संरक्षण केले तर भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून दिला.
राज्यस्तरीय प्रशिक्षक  प्रणय कमले हे त्यांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्री मावळी मंडळ संघाने बरेच विजय संपादन केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *