माथेरान : माथेरानच्या पनवेल बाजूस असलेली आदिवासी वाडी हाशाची पट्टी करिता धोधानी येथून कायमस्वरूपी रस्ता बनवला जावा याकरता वनविभागाने हिरवा कंदील दिला असून लवकरच ही वाडी डांबरी रस्त्यामार्फत विकासाच्या प्रवाहात सामील होणार आहे.

माथेरानच्या डोंगर दरीमध्ये वसलेले हाशाची पट्टी ही आदिवासी वाडी पनवेल वनक्षेत्र मध्ये येते व त्यानुसार पनवेल तालुक्यातील मालदुंगे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील हाशाची पट्टी ते चिंचवाडी रस्त्यासाठी क्षेत्र 0:600 हेक्टर वनक्षेत्र मागणी केली होती. त्यानुसार अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वननिवासी वन हक्कांसाठी अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 मधील कलम 3(2) चे अधीन राहून हाश्याची पट्टी ते चिंचवाडी रस्त्यासाठी मौजे धोदानी जुने नाव मांलदुंगा तालुका पनवेल येथील राखीव वन कंपार्टमेंट मधील एकूण 0:600 हेक्टर वनक्षेत्र समावेश करून, या वन शेत्रातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करणेसाठी3,86,05,913 कोटी अंदाजपत्रक प्रस्तावित आहे.

या रस्त्याच्या कामांकरिता 0:600हेक्टर वन क्षेत्र मध्ये सुमारे दोन हजार मीटर लांबीचा व 3 मीटर रुंदीची मर्यादा घालून देण्यात आले असून या प्रकल्पामध्ये 44 वृक्षांची तोड होणार असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे या मंजुरी दरम्यान वृक्षतोडीचे बदल्यात यंत्रणेने दुप्पट झाडे लावणे बंधनकारक आहे त्याकरिता वृक्ष लागवडीकरिता रस्त्याचे लगत अथवा प्रकल्पाचे आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये दुप्पट वृक्षांची लागवड करण्याची असून त्याकरता कमीत कमी पाच वर्षाच्या वृक्ष लागवड व संगोपना करता वनपरिक्षेत्राधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली योजना तयार करून राबवण्याचेही परवानगी मध्ये नमूद केले आहे.

हाशाची पट्टी हे एक अतिदुर्गम असे आदिवासी वाडी असून या ठिकाणी रस्ता झाल्यास तेथील मुलांच्या शैक्षणिक प्रगती वैद्यकीय सुविधा व राहणीमान सुद्धा सुधारणार असल्याने सर्व स्तरातून हा रस्ता मंजूर झाले त्यांचे कौतुक होत आहे,

1965 स्वर्गीय  यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पनवेल धोदानी माथेरान या रस्त्यात मंजरी मिळाली होती परंतु हा रस्ता शासनाच्या लाल फिती मध्ये आजही अडकला असून त्यानंतर मागणी करून हाशाचे पट्टी या वाडीचा रस्ता मंजूर झाला आहे त्यामुळे माथेरानलाही पर्यायी रस्त्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून पनवेल मध्ये होत असलेल्या नवीन विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता झाल्यास माथेराच्या पर्यटनास अधिक चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *