निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण देणार

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. याविषयी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि सचिव दीपक गाडगीळ यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित क्लबपैकी एक असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रिकेटची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंना माजी रणजीपटू निरंजन गोडबोले, इंद्रजीत कामतेकर, पराग शहाणे व चारुदत्त कुलकर्णी या अनुभवी प्रशिक्षकांतर्फे वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून पुण्यात होणाऱ्या विविध स्पर्धातही त्यांना सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे या निवड झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षक, फिजिओ, आहारतज्ञ यांचेदेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या निवड चाचणी संदर्भात खेळाडूंनी 15 व 16 तारखेला सकाळी साडेआठ वाजता पीवायसीच्या मैदानावर इंद्रजीत कामतेकर यांच्याशी  संपर्क साधावा. तसेच, या निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना नावनोंदणी करणे बंधनकारक असून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी श्री इंद्रजीत कामतेकर, मोबाईल क्रमांक 9309275864 या क्रमांकावर अथवा www.pycgymkhana.com या संकेत स्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *