मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशानचाही गेम करायचा होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीं यांच्या वांद्रेयेथील कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावेळी बाबा सिद्दीक यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या पायातही गोळी घुसली होती.
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर आत्तापर्यंत पाच नावं समोर आली आहेत. यामध्ये शिव कुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर, शुभम लोणकर, गुरमेर सिंग आणि धर्मराज अश्यप , अशी या पाच आरोपींची नावे आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये एकाच नाव शिवकुमार आहे, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला आरोपी २३ वर्षीय गुरमेर सिंग हा हरियाणाच्या कैथल या जिल्ह्यातील नरड गावचा राहिवासी आहे. दुसरा आरोपी धर्मराज कश्यपहा १९ वर्षीय आहे. तो उत्तर प्रदेशच्या बहराइच या गावचा आहे. सध्या शिव कुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर आणि शुभम लोणकर याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल आणि २८ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. चार मोबाईल फोन आणि आधारकार्डही आरोपींकडे सापडले आहेत.
धर्मराज आणि शिव कुमार दोघेही उत्तरप्रदेशच्या बहराईच या गावचे राहिवासी आहे. शिवकुमार आणि धर्मराज यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना सापडलेली नाही. शिवकुमारची आई मीडियाशी बोलताना म्हणाली, मी सकाळी उठल्यानंतर माझ्या कामाला सुरुवात केली होती. तेव्हा मला समजले की, माझा मुलगा मुंबईत अडकला आहे. माझा मुलगा पुण्यात राहत होता. मी विचारले की, ते लोक पुण्यात राहत होते, मुंबईत कसे पोहोचले? शिवा माझा मोठा मुलगा आहे. होळीच्या ८ दिवसानंतर तो इथून निघून गेला. यापूर्वी त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि शुभम लोणकर यांनी कथित शूटर असलेल्या तीघांना सिद्दिकी यांची हत्या करण्याचे काम सोपवले होते. अधिकारी पुढे बोलताना म्हणाले, आम्ही शुभम लोणकरला शोधण्यासाठी पुण्यात गेलो होतो. मात्र, तो तेथे मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकर याला ताब्यात घेतले. शुभम लोणकरने फेसबुक पोस्ट टाकत बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
गुरमेर सिंग हरियाणाच्या कैथलमधील नरडचा राहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात केवळ त्याची आजी आहे. गुरमेरच्या आजीने सांगितले की, १२ वर्षांपूर्वीच आम्ही त्याला कुटुंबातून बेदखल केले आहे. तो माझा नातू आहे. मात्र, आता माझं आणि त्याचं कोणतंही नात नाही. आता त्याला कोणी मारुद्या किंवा सोडून द्या. आमचं काही देण घेणं नाही. त्याचा आम्हाला गेल्या चार महिन्यांपासून कोणताही पत्ता नाही. तेव्हापासून त्याचा कोणताही फोन आलेला नाही. तो घरीही येत नाही.
