मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, शहिद स्मारक हॉल येथे कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ या दीर्घ कवितेचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली
दि. १९/१०/२०२४ रोजी शनिवारी संध्या. ४ ते ७ या वेळेत संपन्न होणार आहे. या आधी त्यांचा ‘शोध’ कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. मराठी साहित्यातील जे महत्त्वाचे कवी आहेत. त्या मध्ये कवी अनंत धनसरे यांच्या नावाचा उल्लेख होतो. ‘एक सत्य’ दीर्घ कविता हा त्यांचा दुसरा संग्रह आहे.
सदर प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ समिक्षक प्रा. डॉ शामला गरुड, प्रा. डॉ. अविनाश कोल्हे, प्रा. डॉ. सुनील पवार, प्रा. दिलीपकुमार कांबळे आणि शहिद स्मारक सभागृहाचे उपाध्यक्ष मंगेशभाऊ पगारे उपस्थित राहणार असून प्रास्ताविक जीवन भालेराव आणि सुत्रसंचालन दादासाहेब यादव करणार आहेत.
मराठीतील अनेक प्रसिद्ध साहित्यिकांनी गौरविलेल्या या पुस्तकाला वाचक रसिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असून महिन्याभरात प्रकाशन पूर्व शंभराहून अधिक प्रति विकल्या गेल्या आहेत.
माणूसकी कलंकित होईल येवढ्या भयावह वास्तवात जगत असलेल्या आणि ज्यांचे आयुष्य म्हणजे वेदना, पिडा, दु:ख असे क्रुर समीकरण झालेल्या शोषितांचा आक्रोश कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ दीर्घ कवितेच्या शब्दा शब्दातून व्यक्त होतो, असे प्रसिद्ध समिक्षक प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी म्हटले आहे.
शहिद स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकभाऊ हिरे, कवी सतिश धिवर, जगदीश खरे ( गण नायक ) साहित्यिक अरूण वाघ, माजी नगरसेवक उदयराज तोरणे, सुनील मोहन शिरसाट आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *