प्रशांत शिंदे

मुंबई : दसरा संपल्यानंतर माहीमच्या गल्लीला वेध लागतात ते कंदीलाचे. अवघ्या कंदीलाने माहीमच्या गल्ल्या सजून जातात. माहीमच्या कवळी वाडीत गेल्या ४२ वर्षापासून कंदील बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरु असल्याने कवळी वाडीची ओळख कंदील गल्ली म्हणून झाली. सध्या कापड, नेट, कागद व पुठ्याच्या कंदीलाला चांगली मागणी आहे.

 इकोफ्रेंडली कंदील बनविण्यासाठी महागड्या रंगीबिरंगी नक्षीदार पैठणी व सिल्क साड्या, जाळीदार कापड, कागद व पुड्यांचा वापर केला जात असून कच्चे मटेरियल महाग असल्याने सालाबादप्रमाणे यंदाही आकाश कंदिलाच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील सर्वाधिक उलाढाल असणारे आकाश कंदील बाजार असल्याने मुंबईसह पुणे, अमेरिका व दुबई, कतार येथून कंदील घेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी या कंदील बाजाराला भेट देतात.

ऐन महागाईच्या काळात हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कवळी चाळीतील कुटुंब वर्षानुवर्षे आनंदाने हा व्यवसाय करीत आहेत. एन निवडणूकांच्या धामधामूती ही दिवाळी आल्याने राजकीय कंदीलालाही मोठ्याप्रमाणात मागणी आहे. यावेळी कंदील बाजारात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या लहान मोठ्या आकारातील जगदंब कंदीलची मोठी धूम दिसत आहे. त्या खालोखाल पुष्पा कंदील, आकाश कंदील, करंजी कंदील, अनार कंदील, ट्रिपल कागदी मटका कंदील, साडी कंदील, कागदी बॉल, नेट कंदील, कार्टूनसारखे डोळे दिपवून टाकणारे वेगवेगळ्या आकारातील कंदील बनविण्याचे काम जोरात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *