पहिली अखिल भारतीय फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा

मुंबई : एसएमसीए-चेस स्कूल आयोजित पहिल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवलेले मुंबईचे चॅलेंजर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी आणि अर्णव खर्डेकर हे संयुक्तरित्या आघाडीवर आहेत.
रशियन हाऊस, पेडर रोड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत बुधवारी अव्वल क्रमांकावर असलेल्या कुलकर्णीने (2185) काळ्या मोहऱ्यानिशी खेळत निझमो इंडियन क्लासिकच्या सलामीला दिल्लीच्या सैकत नाथविरूद्ध (1829) टॉप बोर्डवर निवडले. दडपणाखाली असलेल्या दिल्लीच्या खेळाडूने 29व्या चालीवर चूक केली आणि कुलकर्णीने संधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, खर्डेकर (1846) पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत यश कापडी विरुद्ध (1818) फिलिडोर बचावाच्या सलामीने सुरुवात केली आणि डावावर संपूर्ण नियंत्रण राखले. मात्र,  47व्या चालीतील चूक महागात पडली.
निकाल – टॉप १०: सातवी फेरी: एआयएम सैकत नाथ (५.५) पराभूत आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (६.५) ०-१;
अथर्व सोनी (6) बरोबरी वि. यश वाटरकर (6) 0.5-0.5;
अर्णव खर्डेकर (6.5) विजय वि. यश कापडी (5);
उडुपी आचार्य (5) पराभूत संजीव मिश्रा (6);
दर्श शेट्टी (6) विजयी वि. आतिश लद्दड (5) 1-0;
दीपक सोनी (5) पराभूत वि. गुरुप्रसाद कुलकर्णी (6) 0-1;
तरुण एन (5) पराभूत वि. क्षौनीश जैस्वाल (6) 0-1;
शुभ पटेल (5) पराभूत वि. कार्तिक कुंभार (6) 0-1;
युती पटेल (6) विजयी वि. प्रिशा मरगाई (5) 1-0;
श्रद्धा पडवेकर (4.5) पराभूत वि. ओम गडा (5.5) 0-1.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *