ठाणे महानगर पालिकेच्यावतीने गुरूवारी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, उपायुक्त सचिन सांगळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, ठाणेकर नागरिक आदी उपस्थित होते.
0000
