ठाणे : बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतीगृहात जाणं सर्वसामान्य कुटुंबासाठी खर्चिक असल तरी ठाणे सिव्हील रुग्णालयातील अद्यावत प्रसूतीगृह बाळांसाठी वरदान ठरत आहे. अत्यंत जोखमीच्या प्रसूती सुखरूप पार पडत असून, नुकतेच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असून, शुक्रवारी दीड महिन्याच्या उपचारा नंतर आई आणि बाळांना घरी पाठवण्यात आले.

सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आधारवड ठरत असून, जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयातील प्रसूतीगृह अद्यावत असून, प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. सर्वसुख सोयींनी सज्ज असणाऱ्या प्रसूतीगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती गृहात एका महिलेने  तीन सुदृढ बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बाल रोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली.

भिवंडी मध्ये रहाणाऱ्या नाझमिन (३१) यांनी ४ सप्टेंबर रोजी तीन बाळांना जन्म दिला आहे. तीन अपत्यांमध्ये मुल असून, त्यांची  प्रकृती चांगली आहे. वजन अनुक्रमे पहिले  एक किलो २०० ग्रॅम, दुसरे एक किलो तर  तिसरे ९०० ग्रॅम असे आहे. विशेष म्हणजे तीन बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. दीड महिन्यात बाळाचं वजन वाढल असून,  योग्य उपचारानंतर शुक्रवारी घरी पाठवण्यात आले. प्रसूतीच्या वेळी बाल रोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भुल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे या बरोबर डॉ. शैलेश गोपनपल्लीकर, डॉ. राहुल गुरव, एसएनसीयू परिचारिका सारिका शेणेकर आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, नाझमिन  पोटात तीन बाळ आहेत. हे समजताच खूप आनंद झाला होता. यानंतर नाझमिन हिने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य व वेळोवेळी तपासणी केली. प्रसूतीत एकापाठोपाठ तीन बाळांना जन्म दिला. तीनही बाळ व आई सुखरूप असून आमच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मला अभिमान आहे.

डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे,)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *