नितीन दुधसागर

ठाणे : वाढदिवस म्हंटला की एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये अथवा मोकळ्या प्रांगणात साजरा करायला अनेकांना आवडत असले तरी याला काहीसा छेद देण्याचा प्रयत्न पत्रकार नितीन दुधसागर यांनी केला आहे. आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी चक्क मुलांचे आश्रम गाठले आहे. येऊर् मधील स्वामी विवेकानंद बालक आश्रमात मुलांसमवेत राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रमंडळीच्या उपस्थितीत वाढदिवसाचा आनंद लुटला.

सामाजिक राजकीय आणि पत्रकार मित्रांमध्ये अजातशत्रू अशी ओळख असणारे पत्रकार नितीन दुधसागर यांनी आपला वाढदिवस येऊर विवेकानंद बालक आश्रमात साजरा केला. आपण एक समाजाचे देणे लागतो या एकाच भावनेने त्यांनी आपला वाढदिवस आश्रमातील मुलांबरोबर साजरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी आखणी देखील अगोदरच करून ठेवली होती. वाढदिवसाच्या छोटेखानी कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आश्रम शाळेतील मुलांनी नितीन दुधसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच मुलांनी गाणी आणि नृत्य सादर करून आलेल्या पाहुण्याची मन देखील जिंकली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करताना पुष्पगुच्छ आणि गमचे…दिले.. यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी नितीन दुधसागर यांच्या विषयी मनोगत व्यक्त करून भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी नितीन दुधसागर यांनी मुलांसाठी खास व्हेज बिर्याणी देखील ठेवली होती.

आपल्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक कार्याला वेळ देणे देखील खूप महत्वाच आहे. यावेळेला सदुपयोग करताना माझा वाढदिवस आश्रम शाळेतील मुलांबरोबर सर करण्याचे मी अगोदरच ठरवले होते. यामुलांनसमवेत वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद मिळाला. माझा हा अधदिवास नक्कीच संस्मरणीय राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *