विठ्ठलवाडी पोलिसांची कामगिरी

उल्हासनगर-  हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ नागरिकांचे त्यांचे हरवलेले किंबहुना गहाळ झालेले मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने दसऱ्याच्या दिवशी परत केल्याची घटना ताजी असतानाच, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने कोजागरी पौर्णिमेच्या सायंकाळी ५१ नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या मोबाईलची गिफ्ट देण्यात आली आहे.

 

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५१ नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशा तक्रारी केल्या होत्या. अशावेळी पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक सपकाळे, पोलिस गणेश ढमाळे, कृपाल शेकडे यांनी मोबाइल CEIR पोर्टलच्या तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाद्वारे ५१ मोबाईलचा शोध घेतला.

 

नागरिकांना याची माहिती देऊन कोजागरी पौर्णिमेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एनसीटी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोबाईल परत करण्याची गिफ्ट देण्यात आली. यावेळी तक्रारदार नागरिक, पोलिस मित्र आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. कोजागरी पौर्णिमा व जवळ येणारी दिवाळी सण यानिमित्त पोलिसांनी आम्हाला आमच्या मोबाईलची गिफ्ट मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *